India Pakistan War : दोन्ही देशांच्या DGMO मध्ये फाेनवरुन चर्चा; शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही, पाकिस्तानची ग्वाही

भारत पाकिस्तान चर्चा: DGMO फोनवर शस्त्रसंधीची ग्वाही, गोळीबार होणार नाही.शारा
Published by :
Riddhi Vanne

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशातील नागरिकांना संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. दहशवादाच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही. पाकिस्तानसोबत (Pakistan) चर्चा होईल ती फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यांवरच होईल, असे पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितले. तर, दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीबाबत सायंकाळी 5 वाजता चर्चा झाली.

दोन्ही देशांच्या डीजीएमओ (DGMOs) ही चर्चा फोनवर झाली. या चर्चेनुसार दोन्ही देशांच्या सीमारेषेवर एकाही बंदुकीतून गोळी सुटणार नाही. यानंतर दोन्ही देश शस्त्रसंधी कायम असणार आहे, अशी माहिती भारतीय सैन्य दलाकडून (Indian army) माहिती मिळत आहे. काहीवेळा पुर्व सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शस्त्रसंधीची जाहीर केल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर तासाआधीच सीमेरेषेवर गोळीबार सुरु करण्यात आला. त्यावरुन,पु्न्हा एकदा दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com