IND vs PAK Live Streaming Asia Cup 2025  : विराट-रोहितशिवाय भारत-पाकिस्तान सामना
IND vs PAK Live Streaming Asia Cup 2025 : विराट-रोहितशिवाय भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या LIVE कसं पाहता येणार IND vs PAK Live Streaming Asia Cup 2025 : विराट-रोहितशिवाय भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या LIVE कसं पाहता येणार

IND vs PAK Live Streaming Asia Cup 2025 : विराट-रोहितशिवाय भारत-पाकिस्तान सामना, LIVE कसं पाहता येणार जाणून घ्या....

विराट-रोहितशिवाय भारत-पाकिस्तान सामना: तरुण खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

आशियातील मोठी क्रिकेटची मोठी लढत होणार आहे.

दुबईमध्ये १४ सप्टेंबरमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.

प्रथमच या सामान्यात विराट, रोहित शर्मा सारखे दिग्गज खेळाडू नसणार.

आशिया कप 2025 मधील सर्वात मोठी क्रिकेट लढत अवघ्या काही तासांवर आली आहे. 14 सप्टेंबर रोजी दुबई येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंगणार असून रात्री 8 वाजता पहिल्या चेंडूस सुरुवात होईल. विशेष म्हणजे गेल्या दशकात प्रथमच विराट कोहली, रोहित शर्मा, बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांसारखे दिग्गज खेळाडू मैदानावर दिसणार नाहीत. तरीसुद्धा तरुण खेळाडू आणि अनुभवी ऑलराउंडर्स या हायव्होल्टेज सामन्याला रंगतदार बनवण्यासाठी सज्ज आहेत.

सामन्याचं थेट प्रक्षेपण Sony Sports Network वर होणार असून मोबाईल आणि लॅपटॉपवर प्रेक्षकांना Sony LIV अॅप द्वारे पाहता येईल. त्यामुळे घरी असो वा प्रवासात, चाहत्यांना थेट प्रसारणाचा आनंद घेता येणार आहे.

इतिहासाकडे पाहिलं तर आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात एकूण 19 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 10 वेळा विजय मिळवला, पाकिस्तानने 6 सामने जिंकले, तर 3 सामने पावसामुळे रद्द झाले. पाकिस्तानने शेवटचा विजय 2022 मध्ये दुबईत नोंदवला होता.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव

भारताचा संपूर्ण संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, संजू सॅमसन.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

साहिबजादा फरहान, सॅम अयुब, फखर जमान, मोहम्मद हरीस (यष्टीरक्षक), सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद, सुफियान मुकीम.

पाकिस्तानचा संपूर्ण संघ : सलमान आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, साहिबजादा फरहान, सॅम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी, सुफन शाह.

थोडक्यात, विराट आणि रोहितशिवाय मैदान सजलं असलं तरी नव्या पिढीतील खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे हा सामना चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com