Video | India-Pakistan War : जल, थल, आकाश...; पाकड्यांच्या मनसुब्यांवर पाणी, भारतीय लष्कराकडून ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ जारी

Video | India-Pakistan War : जल, थल, आकाश...; पाकड्यांच्या मनसुब्यांवर पाणी, भारतीय लष्कराकडून ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ जारी

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे. 7 मे रोजी भारताने दहशतवाद्यांची 9 तळ उद्ध्वस्त केल्यांनतर आता पाकिस्तान आणि भारतातला (India-Pakistan War ) तणाव वाढताना दिसत आहे. (India-Pakistan War)

यातच पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भ्याड हल्ले केले आहेत. जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा पाकिस्तानने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. दरम्यान, एका पाकिस्तानी पायलटलाही भारतीय सीमेत पकडण्यात आले. पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. (India-Pakistan War) भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व हल्ले हाणून पाडले. भारतानं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीसह अनेक क्षेपणास्त्र नष्ट केलीत.

भारताने पाकिस्तानला चांगलेच उत्तर दिलं असून यातच आता भारतीय लष्कराकडून ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. कशाप्रकारे भारताने पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला ते या व्हडिओतून लक्षात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com