India Vs Pakistan War : भारताकडून पाकिस्तानच्या एअरबेसचं मोठं नुकसान, पाकिस्तानी एअर मार्शलचा दावा

भारताचा प्रत्युत्तर: ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे 9 एअरबेस उद्ध्वस्त, माजी एअर मार्शलचा दावा.
Published by :
Riddhi Vanne

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच एका निवृत्त पाकिस्तानी अधिकाऱ्याने याबाबत खुलासा करत गौप्यस्फोट केला आहे. पहलगामच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. यात पाकिस्तानचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले. ऑपरेशन सिंदुरच्या वेळी ज्या क्षेपणास्त्रांचा वापर केला. भारताच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत पाकिस्तान एकही क्षेपणास्त्र थांबवू शकला नाही. पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीचं भारतीय सैन्यापुढे काहीही चालले नाही. त्यातच आता पाकिस्तानच्या माजी एअर मार्शलने दावा केला की भोलारी एअरबेसवर चार क्षेपणास्त्रे पडली होती.

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचे झालेले नुकसान:

1. 02 जेएफ-17 (JF-17) (एक लढाईत आणि एक शाहबाज एअरबेस, जेकोबाबाद येथे उड्डाण करण्याच्या तयारीत असताना ज्यामध्ये स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफसह एकूण 05 हवाई योद्धे शहीद झाले.)

2. 1 मिराज फायटर जेट

3. 1 एरीआए अवाक्स (AWACS) विमान ज्याबद्दल पाकिस्तानी हवाई दलाच्या माजी एअर मार्शलने खुलासा केला होता

4. 01 इतर विमान (कदाचित सी-130 लष्करी वाहतूक विमान. (त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे)

नूरखान एअरबेसवर जळत असलेले पाकिस्तानी हवाई दलाचे सी-130 विमान. व्हिडिओमध्ये आणखी एक C-130 उभे असल्याचे दिसत आहे. त्याचे किती नुकसान झाले आहे हे स्पष्ट नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com