IND VS PAK : पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याबद्दल भारतीय जवानाला NIA कडून अटक

भारतीय जवान मोतीराम जाटला NIA ने अटक; पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप.
Published by :
Riddhi Vanne

नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीने ASI मोतीराम जाटला 26 मे रोजी दिल्लीतून अटक केली. पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली मोतीरामला अटक करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पाच दिवस आधीच मोतीरामची ट्रान्सफर झाली होती. मोतीराम जाट मागच्या दोन वर्षांपासून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती पुरवत होता, तपासातून ही बाब समोर आली आहे.

माहिती दिल्याबद्दल त्याला दर महिन्याच्या चार तारखेला पाकिस्तानी एजेंट्स त्याला 3500 रुपये मिळत होते. हे पैसे मोतीराम त्याच्या पत्नीच्या बँक खात्यामध्ये टाकायचा. त्याबरोबरच खास माहिती पुरवल्यास त्याला 1200 रुपये जास्तीचे दिले जात होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मोतीरामकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर रेट निश्चित केले होते. माहिती वेळेत आणि अचूक असल्याची खात्री पटल्यानंतरच पैसे दिले जायचे NIA कडून भारतीय जवान मोतीराम जाटला दिल्लीतून अटक पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. केवळ 3500 रुपयांसाठी पाकिस्तानला भारताची माहिती पुरवल्याचा NIA च्या चौकशीत माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com