Asia Cup Hockey : विश्वचषक पात्रतेसाठी भारताची निर्णायक मोहीम
Asia Cup Hockey : विश्वचषक पात्रतेसाठी भारताची निर्णायक मोहीमAsia Cup Hockey : विश्वचषक पात्रतेसाठी भारताची निर्णायक मोहीम

Asia Cup Hockey : विश्वचषक पात्रतेसाठी भारताची निर्णायक मोहीम

भारताची निर्णायक मोहीम: आशिया चषक जिंकून विश्वचषकात थेट प्रवेश मिळवण्याची शेवटची संधी.
Published by :
Team Lokshahi
Published on

Last chance for the Indian Hockey Team : आज जागतिक क्रीडा दिन असल्याने भारताचा आशिया चषकातील प्रवास अधिकच महत्त्वाचा ठरत आहे. भारतीय पुरुष हॉकी संघासाठी आशिया चषक ही स्पर्धा यंदा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. कारण विजेतेपद पटकावल्यास संघाला पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना चीनविरुद्ध शुक्रवार खेळवला जाणार असून, या स्पर्धेत प्रत्येक सामना निर्णायक ठरणार आहे.

मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी स्पष्ट केले की, युरोपमधील प्रो लीग फेरीत भारताला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आता हीच पात्रतेची शेवटची संधी आहे. “आम्ही या स्पर्धेसाठी सर्वस्व पणाला लावले आहे. आशिया चषक जिंकून आशियात अव्वल स्थान मिळवणे आणि विश्वचषकात स्थान निश्चित करणे हा आमचा उद्देश आहे,” असे फुल्टन यांनी सांगितले.

2017 मध्ये ढाक्यात भारताने शेवटचे आशिया चषक विजेतेपद पटकावले होते. मागील स्पर्धेत भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यावेळी संघाने आक्रमणासोबतच बचावरेषेवरही अधिक भर दिला आहे. “गोल करणे महत्त्वाचे आहेच, पण गोल वाचवणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. प्रो लीगमध्ये आम्ही अनेक गोल दिले आणि त्याचा परिणाम पराभवात झाला. यावेळी आम्ही दोन्ही विभागात सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे,” असे प्रशिक्षकांनी सांगितले.

फुल्टन यांनी अनुभवी खेळाडूंवर भर दिला असून तरुणांना या वेळी संधी देण्यात आलेली नाही. पात्रतेचा टप्पा पार केल्यानंतर नव्या खेळाडूंना संघात समाविष्ट करण्याची रणनीती आखली आहे. संघाच्या मानसिक तयारीसाठी पॅडी अप्टन यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. पॅडी यांनी पॅरिस ऑलिंपिकदरम्यानही भारतीय खेळाडूंसोबत काम केले होते. भारतासाठी आशिया चषक म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे, तर विश्वचषकात प्रवेश निश्चित करण्याचा शेवटचा मार्ग आहे. त्यामुळे पुढील 10 दिवस भारतीय संघाकडून झुंजार लढत अपेक्षित आहे. आजचा जागतिक क्रीडा दिन भारतीय संघाच्या निर्धाराला आणि खेळाडूंच्या प्रेरणेला अधिक बळकट करणारा ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com