IndiGo : इंडिगोचे सीईओ डीजीसीएसमोर आज अहवाल सादर करणार; अहवालात संकटाची कारणं देण्याचे निर्देश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(IndiGo ) इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून गंभीर अडचणींना सामोरे जात आहे. कंपनीने अनेक उड्डाणे रद्द केली. केबिन क्रूची कमतरता, तांत्रिक अडचणी आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात सेवा बाधित होत आहेत.
इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या लोकांनी इंडिगोची बुकींग केली आहे त्यांना याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज इंडिगोचे सीईओ डीजीसीएसमोर अहवाल सादर करणार आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोच्या सीईओंना चौकशी समितीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावले. सीईओंनी एक दिवसाची मुदतवाढ मागितली, होती ती मंजूर करण्यात आली असून आज दुपारी 3 वाजता डीजीसीएसमोर हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. या अहवालात इंडिगोच्या संकटाची कारणं देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
इंडिगोचे सीईओ डीजीसीएसमोर सादर करणार अहवाल
अहवालात इंडिगोच्या संकटाची कारणं देण्याचे निर्देश
आज दुपारी 3 वाजता अहवाल सादर करणार
