ताज्या बातम्या
Adani meets Fadnavis : उद्योगपती गौतम अदानी सागर निवासस्थानी, फडणवीसांची घेतली भेट
गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील विविध प्रकल्पांवर दीड तास चर्चा.
अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची सागर या शासकीय बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. राज्यातील विविध प्रकल्पांबद्दल ही चर्चा झाल्याचं समजते आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आणखी एका प्रकल्पाची बोली अदानी समूहाने जिंकली असून, त्यानंतर गौतम अदानी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील ही पहिली भेट आहे.