Mahayuti : आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीतच धुसफूस?; अनेक जिल्ह्यात युतीबाबत शिवसेनेत विरोध?

महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजले आहेत. याच पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे बंधूंची युतीची चर्चा जोर धरत असतानाच दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढविण्यासाठी महायुतीतील पक्षाचे स्थानिक पातळीवर एकमत नसल्याचे पहिला मिळत आहे.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीतच धुसफूस असल्याची चिन्ह

  • जिल्हानिहाय बैठकीच्या अहवालातून निर्णय होणार

  • कोणत्या महापालिकेत विरोधी भूमिका पक्षांनी घेतल्या आहेत.

महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजले आहेत. याच पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे बंधूंची युतीची चर्चा जोर धरत असतानाच दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढविण्यासाठी महायुतीतील पक्षाचे स्थानिक पातळीवर एकमत नसल्याचे पहिला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर नेमकी काय गणित सुरू आहेत आणि कोणत्या महापालिकेत विरोधी भूमिका पक्षांनी घेतल्या आहेत.

कोणत्या जिल्ह्यात महायुतीमध्ये धुसफूस?

ठाणे

ठाण्यात भाजपकडून स्वबळाचा नारा, शिवसेनेत नाराजीचं वातावरण, शिवसेनेची स्वबळाची तयारी

नवी मुंबई

मंत्री गणेश नाईकांचं शिंदेंबाबत वक्तव्यावरून मतभेद

भाजप शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु

कल्याण डोंबिवली

गणपत गायकवाडांच्या गोळीबार प्रकरणानंतर भाजप शिवसेनेचे संबंध टोकाचे

भाजपकडून स्वबळाची तयारी सुरू

मिरा-भाईंदर

भाजप शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू

बदलापूर

भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे युतीची शक्यता कमी

उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा वरचष्मा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com