Note 50s 5G Launch : Infinix घेऊन आलाय भारतातील सर्वात स्लिम स्मार्टफोन; किंमत अगदी परवडणाऱ्या दरात

Note 50s 5G Launch : Infinix घेऊन आलाय भारतातील सर्वात स्लिम स्मार्टफोन; किंमत अगदी परवडणाऱ्या दरात

Infinix Note 50s 5G: ₹15,999 मध्ये 7.6mm जाडीचा सर्वात स्लिम स्मार्टफोन; 6.78-इंच AMOLED डिस्प्ले, 5500mAh बॅटरी
Published by :
Team Lokshahi
Published on

इन्फिनिक्सने भारतातील सर्वात स्लिम स्मार्टफोन ‘Note 50s 5G’ लाँच केला; किंमत फक्त ₹15,999 पासून आहे.

टेक प्रेमींना आकर्षित करणाऱ्या इन्फिनिक्सने आज आपला नवीन स्मार्टफोन Infinix Note 50s 5G लॉंन्च करण्यात आला आहे. भारतीय बाजारात सादर केला आहे. बजेट सेगमेंटमध्ये आलेल्या या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याचा 6.78-इंचाचा वक्र AMOLED डिस्प्ले आणि केवळ 7.6mm जाडी, ज्यामुळे हा भारतातील सर्वात स्लिम 5G स्मार्टफोन ठरतो, असा दावा कंपनीने केला आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ₹15,999 ठेवण्यात आली असून, तो येत्या २४ एप्रिलपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Infinix Note 50s 5G चे खास फिचर्स:

डिस्प्ले: 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा वक्र AMOLED डिस्प्ले. स्क्रीन ब्राइटनेस 1300 निट्स पर्यंत.

कॅमेरा: मागील बाजूस 64MP Sony IMX682 मुख्य कॅमेरा हॅलो लाइटिंगसह, आणि 13MP फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी.

बॅटरी: 5500mAh बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह. वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट.

प्रोसेसर व OS: MediaTek Dimensity 7300 चिपसेटसह Android 15 वर आधारित XOS 15 UI.

रॅम आणि स्टोरेज: 8GB रॅम आणि 128GB व 256GB असे दोन स्टोरेज पर्याय.

याआधी, इन्फिनिक्सने Note 50x मॉडेल लाँच केले होते, ज्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता Note 50s 5G द्वारे कंपनी अधिक परफॉर्मन्स, डिझाईन आणि बजेट यांचा परिपूर्ण मेळ साधण्याचा प्रयत्न करत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com