Admin
बातम्या
महागाईचा सर्वसामान्यांना फटका; कडधान्यांच्या किमती कडाडल्या, जाणून घ्या दर
महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या महागाईचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. घरातल्या गृहीणींचे बजेट चांगलेच कोलमडले आहे. ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्यांच्या किंमती कडाडल्या आहेत.
राज्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याच्या थेट परिणाम कडधान्यांच्या किमतीवर झालेला दिसून येत आहे. ज्वारीचे दर28 ते 50 रुपयांवर पोहोचले आहेत. बाजरी पन्नास रुपये प्रतिकिलो तर उडीद डाळ, मुग डाळ, तूर डाळ होलसेल मार्केटमध्येच शंभरी पार गेली आहे.
पदार्थ दर (प्रति किलो)
तूर डाळ 130 ते 150
मूग डाळ 120 ते 130
उडीद डाळ 120 ते 140
गहू 36 ते 38
ज्वारी 52 ते 70
बाजरी 40 ते 44
मटकी 120 ते 160
शेंगदाणे 140 ते 170
मूग 110 ते 130