चिपळूण शहराची माहिती मिळणार एका क्लिकवर!

चिपळूण शहराची माहिती मिळणार एका क्लिकवर!

शहरात ड्रोनच्या माध्यमातून थ्रीडी सव्र्व्हेक्षण; सुमारे २ कोटी रूपयांचा होणार खर्च

निसार शेख|चिपळूण: अलिकडच्या काही दशकात ठिकठिकाणी उभ्या राहिणाऱ्या इमारतींमुळे चिपळूण शहराचा विस्तार कमालीचा वाढला आहे. लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण शहराची माहिती संकलित करण्यासाठी चिपळूण नगर पालिका प्रशासनाने शहरात थ्रीडी सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले आहे. ड्रोनच्या माध्यमातून या सर्व्हेक्षणाला सुरूवात झाली असून भविष्यात शहराची भौगोलिक रचना, वाड्या-वस्त्या, मंदिरे, शाळा, मालमत्ता, हॉस्पिटल्स, मनोरंजनाची ठिकाणे आदींची माहिती आता ऑनलाईन एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी सुमारे दोन कोटींचा खर्च केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

शहरात सध्या थ्रीडी सव्र्व्हेक्षणाचा पहिला टप्पा म्हणून काही दिवसांपूर्वी ड्रोनच्या माध्यमातून शहराचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या ड्रोनव्दारे शहराची संपूर्ण माहिती संकलित केली आहे. तर दुसरीकडे चतुर्थ वार्षिक कर आकारणी सर्व्हेक्षणासही प्रारंभ झाला आहे. या सर्व्हेक्षणाचे अमरावती येथील स्थापत्य कन्सल्टन्सी या शासनमान्य संस्थेला ड्रोनव्दारे चिपळूण शहराचे सर्व्हेक्षण करताना अमरावती येथील स्थापत्य कन्सल्टन्सी एजन्सीचे या शासन मान्य संस्थेला काम देण्यात आले आहे कामाला सुरूवात झाली असून एजन्सीच्या सुमारे दोनशे कर्मचान्यांसह नगर पालिकेचे काही कर्मचारी या कामात व्यस्त झाले आहेत. संपूर्ण शहराच्या सर्व्हेक्षणासाठी काही महिने लागणार आहेत.

त्यानंतर मात्र एका क्लिकवर संपूर्ण शहराची माहिती मिळणार आहे.या थ्रीडी सव्र्हेंमुळे सध्याच्या मालमत्तांचे खरे क्षेत्र, शाळा, मंदिरे, हॉस्पिटल यांची संख्या किती, त्यामध्ये नेमक्या काय सुविधा आहेत. त्यांचे क्षेत्र किती, घरे, दुकानांचे क्षेत्र किती, किती रूम आहेत. दुकान गाळे, घरे, सदनिका भाड्याने दिल्यात की मालक स्वतः राहतात. त्याच्या मालमत्तेकडे नगर पालिकेचा रस्ता आहे काय, त्याची लांबी, रुंदी किती, नळ कनेक्शन आहे काय, तेथे पाणी कसे मिळते याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे यापुढे कर पावतीवर धराचा फोटो व परिसरातील नकाशाही राहणार आहे. तसेच धोकादायक इमारती प्रकाशझोतात येणार आहेत. याचा पहिला टप्पा म्हणून काही दिवसांपासून घरांवर नंबर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच पेठमाप येथून ड्रोन उडवून तो संपूर्ण शहरावर फिरवण्यात आला आहे. त्यामुळे शहराची माहिती त्याने संकलित केली असून लवकरच ती नगर पालिका प्रशासनाला मिळणार आहे.

यावेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, उपमुख्याधिकारी तथा कर निरीक्षक बाळकृष्ण पाटील, सहाय्यक कर निरीक्षक राजेंद्र खात् यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व संबंधित एजन्सीचे प्रमुख उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com