शाईचा घेतला धसका, विधिमंडळात शाई पेनावर प्रतिबंध

शाईचा घेतला धसका, विधिमंडळात शाई पेनावर प्रतिबंध

भाजप नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते.

भाजप नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यात एकच निषेध व्यक्त केला जात होता. हा विरोध चालू असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. त्या शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे या कार्यकर्त्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले.

याच पार्श्वभूमीवर विधिमंडळातही शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. आज पहिल्या दिवशी विधिमंळात येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. शाईचे पेन नेण्यास बंदी घालण्यात आली.आज पहिल्या दिवशी येथे येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. त्यामुळे सरकारने शाईचा धसका घेतल्याचे दिसून येते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com