INS Vagir : भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज आयएनएस वागीर' पानबुडी होणार सामील
Admin

INS Vagir : भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज आयएनएस वागीर' पानबुडी होणार सामील

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज आयएनएस वागीर' पानबुडी सामील होणार आहे.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज आयएनएस वागीर' पानबुडी सामील होणार आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या स्वदेशी कंपनीने या पाणबुडीची निर्मिती केली आहे. भारतीय बनावटीची माझगाव डॉक येथे बांधण्यात आलेली 'आयएनएस वागीर' ही कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी आहे.

ही 350 मीटर खोलीवर तैनात केली जाऊ शकते. ही पाणबुडी स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे शत्रू सहजासहजी याचा शोध घेऊ शकणार नाही. यामध्ये जहाजविरोधी क्षेपणास्त्रेही बसवण्यात आली आहेत. ही पूर्णपणे स्वदेशी पाणबुडी आहे.'आयएनएस वागीर पाणबुडीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यानंतर आता INS Vagir पाणबुडी भारतीय नौदलात सामील करण्यात येईल.

भारतीय नौदलाला आज (23 जानेवारीला) INS वागीर अटॅक पाणबुडी मिळणार आहे. कलावरी श्रेणीच्या पहिल्या तुकडीतील सहा पाणबुड्यांपैकी ही एक पाणबुडी आहे. संरक्षण तज्ज्ञ याला 'सायलेंट किलर शार्क' असं म्हणतात. ही पाणबुडी शत्रूला चकवा देणे आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. शत्रूला कल्पनाही ने येता ही पाणबुडी त्यावर हल्ला करेल.

भारतीय नौदलाच्या पाचव्या कलावरी श्रेणीतील पाणबुडीने 1 फेब्रुवारीपासून सागरी चाचण्या सुरु केल्या. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या (MDL) कान्होजी आंग्रे वेट बेसिनमधून नोव्हेंबर 2020 मध्ये पाणबुडीचे बांधकाम सुरु करण्यात आले. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही पाणबुडी नौदलात सामील केली जाईल. असे नौदलाने एका निवेदनात सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com