ताज्या बातम्या
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजीचा वाद, शरद पवारांच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्याची उपस्थिती
राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शरद पवारांनी घेतलेल्या बैठकीला शहराध्यक्षांऐवजी भाजप कार्यकर्ता पाठवल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शरद पवारांनी घेतलेल्या बैठकीला शहराध्यक्षांऐवजी भाजप कार्यकर्ता पाठवल्याचं प्रकरण समोर आलं आहे. शहराध्यक्षांचा प्रतिनिधी म्हणून गेलेल्या राष्ट्रवादीच्या महेश गाडेकर यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की, माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून शहराध्यक्षांवर गोळी चालवण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या लोकांना काम करता येत नाही, त्यांना काड्या करणे चांगले जमत. निष्ठावंत म्हणून जे सांगतात ते भाजपची बी टीम म्हणून काम करतात, असं म्हणत मांडली भूमिका.

