Pakistan Debt : पाकिस्तानने पुन्हा हात पसरले ; पण 544 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज कोणी मंजूर केले ?

Pakistan Debt : पाकिस्तानने पुन्हा हात पसरले ; पण 544 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज कोणी मंजूर केले ?

बलुचिस्तानमधील शिक्षण सुधारण्यासाठी पाकिस्तानला कर्ज
Published by :
Shamal Sawant
Published on

पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीबद्दल अनेकदा चर्चा केली जाते. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती इतकी खराब आहे की पुन्हा एकदा पाकिस्तानने हात पसरले. आता पुन्हा एकदा त्यांना 544 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मिळणार आहे. यासाठी त्यांनी जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडे (ADB) अपील केले होते, जे मंजूर झाले आहे. पाकिस्तानने हे कर्ज शिक्षणाच्या नावाखाली घेतले आहे, महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकटी देणे आणि त्यांना सक्षम करणे.

जागतिक बँकेने बुधवारी 25 जून 2025 पाकिस्तानसाठी 194 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आणि महिलांच्या आर्थिक समावेशन आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एडीबीसोबत 350 दशलक्ष डॉलर्सचा कर्ज करार केला. पाकिस्तानी वृत्तवाहिनी 'समा टीव्ही'च्या वृत्तानुसार, पाकिस्तानला जागतिक बँकेकडून दोन प्रकल्पांतर्गत हे कर्ज मिळाले आहे, ज्याचा वापर ते बलुचिस्तान प्रांतातील मुलांना नवीन शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि पाणी सुरक्षा मजबूत करण्यासाठी करेल.

पाकिस्तानमधील जागतिक बँकेचे संचालक नाजी बहसिन म्हणाले की, या प्रकल्पाचे उद्दिष्ट बलुचिस्तानमधील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांसाठी शिक्षण व्यवस्था सुधारणे आहे. पाकिस्तानमधील जागतिक बँकेचे संचालक नाजी बहसिन म्हणाले की, या प्रकल्पाचे उद्दिष्ट बलुचिस्तानमधील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांसाठी शिक्षण व्यवस्था सुधारणे आहे.

9 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत पाकिस्तानचे एकूण कर्ज 76,000अब्ज पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढले आहे. यामुळे, चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानची अर्थव्यवस्था केवळ 207 टक्के दराने वाढू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) यांनी गेल्या वर्षी 7 डॉलर अब्ज बाह्य निधी सुविधा (IFF) कर्ज करारावर स्वाक्षरी केली. पाकिस्तानला आतापर्यंत दोन हप्ते मिळाले आहेत, त्यापैकी दुसरा हप्ते या वर्षी मे महिन्यात वितरित करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com