ताज्या बातम्या
International Women's Day 2025 Wish : महिला दिनानिमित्त आपल्या आयुष्यातील स्त्रीला द्या "या" खास शुभेच्छा
महिला दिनानिमित्त आपल्या आयुष्यातील स्त्रीला पाठवा खास शुभेच्छा संदेश...
दरवर्षी जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने ८ मार्च १९७५ ला महिला दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती. ८ मार्चचा हा खास दिवस महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळण्यासाठी तसेच त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू झाशीची राणी,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू...
“स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ
तुझ्या कर्तव्याला
सर्वांचा सलाम.”
आई, आज मी जे काही आहे
ते फक्त तुझ्यामुळेच आहे,
तू माझ्या आयुष्याची प्रेरणा आहेस..
चौकटीतून बाहेर पडून,
शत्रूंच्या नजरेला नजर भिडवून,
उभ्या ठाकणाऱ्या रणरागिणींना
गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली,
विश्व सारे वसावे