ताज्या बातम्या
Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली क्राइम ब्रँचकडून पुण्यात तपास
पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली क्राइम ब्रँचकडून पुण्यात तपास करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
चंद्रशेखर भांगे, पुणे
पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली क्राइम ब्रँचकडून पुण्यात तपास करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, स्थानिक पोलीस, पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राशी संबधीत शासकीय कार्यालयात चौकशी करण्यात आली.
यासोबतच पूजा खेडकर प्रकरणाशी संबधीत इतर व्यक्तींकडे देखील तपास करण्यात आला असून सोमवारी दिवसभर दिल्ली क्राइम ब्रॅंचकडूत तपास करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
पूजा खेडकरच्या पुण्यातील सर्व रहिवाशी पत्त्यांवर जाऊन सोसायटीमधील लोकांकडे देखील करण्यात चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. क्राइम ब्रँचकडून आज अहमदनगरमध्ये जाऊन तपास करण्यात येणार आहे.