IPL 2024 Points Table
IPL 2024 Points Table

IPL 2024 : लखनऊच्या विजयानंतर गुणतालिकेचं समीकरण बदललं, 'अशी' आहे टॉप ४ ची क्रमवारी

आयपीएल २०२४ च्या १५ व्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठे बदल करण्यात आले आहेत. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानावर आहे.
Published by :

आयपीएल २०२४ च्या १५ व्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठे बदल करण्यात आले आहेत. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. केकेआर दुसऱ्या स्थानावर आहे. सीएसके तिसऱ्या नंबरवर आहे. तर आरसीबीचा पराभव करून लखनऊ सुपर जायंट्सने टॉप ४ मध्ये एन्ट्री मारली आहे. पाचव्या स्थानावर गुजरात टायटन्स आहे. सहाव्या स्थानावर सनरायजर्स हैदराबाद, सातव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स, तर ८ व्या स्थानावर पंजाब किंग्जचा संघ आहे. त्यानंतर आरसीबी आणि मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा संघ नवव्या स्थानावर असून मुंबई इंडियन्स १० व्या स्थानी आहे.

सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज

विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप आहे. कोहलीने ४ सामन्यात २०३ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या नंबरवर रियान पराग आहे. परागने ३ सामन्यात १८१ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या नंबरवर हेनरिक क्लासेन आहे. क्लासेनने ३ सामन्यात १६७ धावा केल्या आहेत. तर निकोलस पूरन चौथ्या स्थानावर आहे. पूरनने ३ सामन्यांत १४६ धावा करण्याची कमाल केली आहे. क्विंटन डिकॉक पाचव्या नंबरवर आहे. डिकॉकने तीन सामन्यांत १३९ धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये गोलंदाजांचीही भेदक कामगिरी

मुस्तफिजूर रहमानने आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. मयंकने दुसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. मयंकने २ सामन्यात ६ विकेट घेतल्या आहेत. तर युजवेंद्र चहल तिसऱ्या स्थानावर आहे. चहलने ३ सामन्यांत ६ विकेट घेण्याची कामगिरी केलीय. मोहित शर्मा ४ नंबरवर आहे. मोहितने आतापर्यंत ३ सामन्यांत ६ विकेट घेतल्या आहेत. तसच खलील अहमदने ५ विकेट घेण्याची कामगिरी केलीय. खलीलने ३ सामन्यांत ७२ धावा देऊन ५ विकेट घेतल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com