IPL 2025
IPL 2025

IPL 2025 : आयपीएलचे नवीन वेळापत्रक आले समोर, 'या' तारखेपासून पुन्हा रंगणार सामन्यांचा थरार

भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारत-पाकिस्तान (India - Pakistan ) दरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर आयपीएलचे (IPL 2025 ) सामने स्थगित करण्यात आले होते. आता भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा आयपीएलचे सामने सुरु होणार आहेत. आयपीएलचे नवीन वेळापत्रक समोर आले आहे.

येत्या 17 मे पासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाणार असून दोन दिवशी दोन सामने असणार आहेत.

आयपीएलचे नवे वेळापत्रक (IPL 2025 ) जाहीर करण्यात आलं असून आता उर्वरित 17 सामने खेळवण्यात येणार असून अंतिम सामना 3 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com