ठाण्यात IPL चे सामने खेळवले जाणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

ठाण्यात IPL चे सामने खेळवले जाणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

ठाण्यात IPL चे सामने खेळवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाण्यात IPL चे सामने खेळवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात आयपीएलचे सामने घेण्याची आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली असून तसे संकेत दिले असल्याचे समजते. महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने व्हावेत, यासाठी बीसीसीआयच्या नियमावलीनुसार मैदानाची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना याचे संकेंत दिले आहेत.

नव्या खेळपट्टीमुळे २५ वर्षांनंतर विजय हजारे रणजी क्रिकेट सामने अलीकडेच येथे पार पडले. याच मैदानात आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंनी सराव केला होता. आयपीलसाठी सराव करायला खेळाडू ठाण्यात यायचे पण, मुक्कामाला मात्र मुंबई गाठायचे. कारण ठाण्यात एकही पंचतारांकित हॉटेल नव्हते. आता प्लॅनेट हॉलिवूड हे पहिले पंचतारांकित हॉटेल ठाण्यात सुरू झाले आहे, पालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. त्याचाच एक भाग म्हणून नामवंत क्युरेटर नदिम मेमन यांच्या देखरेखीखाली पालिकेने बीसीसीआयच्या नियमावलीनुसार आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली आहे.

नव्या खेळपट्टीमुळे मैदानावर रणजी क्रिकेट सामने खेळविणे शक्य झाले असले तरी आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएलचे सामने खेळविण्याकरिता मैदानात अत्याधुनिक दिव्यांची व्यवस्था असणे गरजेचे असल्यामुळे पालिकेने मैदानात तशी विद्युत व्यवस्था उभारणीचे काम सुरू केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com