RAW Chief Parag Jain : RAW च्या प्रमुखपदी पराग जैन यांची नियुक्ती; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पार पाडलेली महत्त्वाची जबाबदारी

RAW Chief Parag Jain : RAW च्या प्रमुखपदी पराग जैन यांची नियुक्ती; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पार पाडलेली महत्त्वाची जबाबदारी

पंजाब कॅडरमधील 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी पराग जैन यांची केंद्र सरकारच्या एका महत्त्वाच्या विभागातील प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पंजाब कॅडरमधील 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी पराग जैन यांची केंद्र सरकारच्या एका महत्त्वाच्या विभागातील प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. “ऑपरेशन सिंदूर” या अत्यंत संवेदनशील कारवाईत त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. RAW चे प्रमुख रवी सिन्हा यांचा कार्यकाळ 30 जून रोजी पूर्ण होत असून, त्यानंतर पराग जैन 1 जुलैपासून RAW चे प्रमुख म्हणून पुढील दोन वर्षांसाठी पदभार स्वीकारतील.

सध्या पराग जैन हे रॉच्या (RAW) एव्हिएशन रिसर्च सेंटरचे नेतृत्व करत आहेत. हे केंद्र देशाच्या हवाई गुप्तचर आणि देखरेख तंत्रज्ञानाशी संबंधित मोहिमा हाताळते. गुप्तचर यंत्रणेमध्ये त्यांचा दोन दशकांहून अधिक अनुभव आहे.

सेवेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पंजाबमध्ये दहशतवादाविरोधात लढताना वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि उपमहानिरीक्षक म्हणून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. रॉमध्ये त्यांनी पाकिस्तानविषयी असलेल्या विशेष विभागात महत्त्वाचे कार्य केले असून, जम्मू-कश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द करण्यात आले, त्या काळातही ते तेथे कार्यरत होते. तसेच त्यांनी श्रीलंका आणि कॅनडा येथील भारतीय दूतावासांमध्येही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. कॅनडामध्ये कार्यरत असताना त्यांनी परदेशातून सक्रिय असलेल्या खलिस्तानी गटांवर लक्ष ठेवले होते.

हेही वाचा

RAW Chief Parag Jain : RAW च्या प्रमुखपदी पराग जैन यांची नियुक्ती; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पार पाडलेली महत्त्वाची जबाबदारी
Madhya Pradesh Crime : नाही बोलणं बायकोला पडलं महागात!; मग नशेत असलेल्या नवऱ्यानं जे केलं ते ऐकून अंगावर येईल काटा
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com