आकाशनंतर आता Isha Ambani कडे मुकेश यांनी सोपवली मोठी जबाबदारी

आकाशनंतर आता Isha Ambani कडे मुकेश यांनी सोपवली मोठी जबाबदारी

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीला मंगळवारी जिओ टेलिकॉम युनिटचा अध्यक्ष बनवल्यानंतर ईशाला मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स ग्रुपमध्ये पुढच्या पिढीला कमांड देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीकडे आता मोठी जबाबदारी सोपविणार आहे. ईशा लवकरच रिलायन्स रिटेल युनिटची अध्यक्ष बनणार आहे. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक ऑपरेशन्सचा भाग असलेली मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आता त्याच्या रिलायन्स रिटेल युनिटची अध्यक्ष बनणार आहे. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, बुधवारी हा निर्णय जाहिर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ईशा अंबानी सध्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लि.चे संचालक आहे.

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीला मंगळवारी जिओ टेलिकॉम युनिटचा अध्यक्ष बनवल्यानंतर ईशाला आता रिटेल युनिटच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. ईशा अंबानी आणि आकाश अंबानी या दोघांनीही मेटा प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूकीसाठी रिलायन्सचे प्रतिनिधित्व केले होते.

दरम्यान, रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ या रिलायन्स समूहाच्या उपकंपन्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही या समूहाची प्रमुख कंपनी असून तिचे मूल्य 217 डॉलर अब्ज आहे. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी गेल्या काही वर्षांत रिलायन्समध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. रिलायन्स रिटेल आणि जिओच्या ऑपरेशन्समध्ये ईशाने महत्त्वाची भूमिका निभावत आहे. 2014 मध्ये ईशा रिलायन्स रिटेल आणि जिओची बोर्ड डायरेक्टर बनली होती. तसेच, 2015 मध्ये, तिचा आशियातील 12 उदयोन्मुख शक्तिशाली व्यावसायिक महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला. दरम्यान, 2018 मध्ये ईशाचे लग्न पिरामल ग्रुप्स फार्मा कंपनीच्या आनंद पिरामलसोबत झाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com