ईशा अंबानी जुळ्या बाळांसह आज भारतात येणार, स्वागताची जंगी तयारी

ईशा अंबानी जुळ्या बाळांसह आज भारतात येणार, स्वागताची जंगी तयारी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद पिरामल हे आज त्यांच्या जुळ्या बाळांसोबत अमेरिकेतून भारतात येणार आहेत.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद पिरामल हे आज त्यांच्या जुळ्या बाळांसोबत अमेरिकेतून भारतात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांचे 12 डिसेंबर 2018 रोजी पिरामल ग्रुपचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी लग्न झाले होते. सकाळी साडेआठ वाजता हे दोघेही व्हीआयपी गेट नंबर आठवर दाखल होणार आहे आहेत. विमानातून येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत असणार आहे.

बाळांच्या स्वागतासाठी ईशा अंबानीच्या 'करुणा सिंधू' निवासस्थानावर देशभरातील एक हजार साधूसंत येणार आहेत. कतार एअरलाईन्सच्या स्पेशल विमानानं लॉस अँजलिसवरुन ईशा अंबानी आणि आनंद पिरामल हे मुंबईत येतील. बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करण्यात आली आहे. बाळांची देखभाल करण्यासाठी अमेरिकेहून आठ स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या नॅनी येणार आहेत. जगभरातील फेमस शेफ याप्रसंगी पंचपक्वान्न बनवणार आहेत. तसेच, तिरुपती, द्वारका येथूनही मिष्ठान्न आणण्यात येतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com