ईशा इनसाइट २०२२ ने भारतातील बिझनेस लीडरशिप कार्यशाळांमध्ये एक नवीन स्तर गाठला

ईशा इनसाइट २०२२ ने भारतातील बिझनेस लीडरशिप कार्यशाळांमध्ये एक नवीन स्तर गाठला

ईशा लीडरशिप अकादमीच्या “इशा इनसाइट: द डीएनए ऑफ सक्सेस” च्या ११ व्या आवृत्तीला सुरुवात करत थॅम्पी कोशी, सीईओ, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) यांनी स्पष्टपणे घोषित केले

उद्योगजगतातील ३० हून अधिक यशस्वी नेते आणि तज्ञांचे एक पॅनेल- ज्यात सद्गुरू, गजेंद्र सिंह शेखावत, सोनम वांगचुक, कुणाल बहल, थम्पी कोशी, चंद्रशेखर घोष, अरविंद मेल्लीगेरी आणि गौतम सरोगी यांचा समावेश आहे - सहभाग्यांना स्वतःला आणि त्यांच्या व्यवसायांना कसे विकसित करावे याबद्दल मार्गदर्शन करत आहे.

ईशा लीडरशिप अकादमीच्या “इशा इनसाइट: द डीएनए ऑफ सक्सेस” च्या ११ व्या आवृत्तीला सुरुवात करत थॅम्पी कोशी, सीईओ, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) यांनी स्पष्टपणे घोषित केले, “ई-कॉमर्स, जसे आज आपल्याला माहित आहे, ते अप्रासंगिक होणार आहे.” ओएनडीसी मिशनचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, "व्यापारातील परिवर्तनाचे माझे स्वप्न हे आहे की प्रत्येक प्रकारच्या विक्रेत्याला एक सामान्य प्रोटोकॉल वापरून त्याची उत्पादने ओपन नेटवर्कवर प्रदर्शित करता आली पाहिजेत."

कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्रात आयोजित केलेल्या ईशा इनसाइट २०२२ ला संबोधताना सद्गुरू, संस्थापक, ईशा फाऊंडेशन, यांनी सहभागींना ते ज्या प्रकारे गोष्टींकडे पाहतात त्यामध्ये एक प्रकारचे अंतर निर्माण करण्याचे आवाहन केले .

“तुम्हाला तुमचा व्यवसाय चालवायचा असेल, तर तुम्ही मुक्तीच्या अवस्थेत असले पाहिजे - की तुम्हाला काहीही स्पर्श करत नाही परंतु तुम्ही पूर्णपणे गुंतलेले आहात, कधीही कशातही अडकलेले नाही,” त्यांनी स्पष्ट केले. “जर आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीपासून आपण अंतर ठेवले नाही - सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या काळात आपण राहतो, त्या काळापासून आपण अंतर ठेवले नाही - तर आपल्याला वास्तविकता जशी आहे तशी दिसणार नाही. आपण ज्या काळात राहतो त्याचे गुलाम बनून राहू.”

माननीय केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या या सत्राने, ग्रामीण भारतात 2024 पर्यंत सर्व कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे ध्येय असलेल्या जल जीवन मिशनला केंद्र सरकार कसे प्राधान्य आणि गती देत आहे याबद्दल सखोल माहिती दिली.

“२०१९ ते २०२४ या कालावधीत भारताची जलक्षेत्रात २१० अब्ज डॉलरची अंदाजे गुंतवणूक ही जगातील सर्वात जास्त आहे,” असे त्यांनी पुढे मांडले आणि सांगितले की २०१९ मध्ये १६% भारतीय कुटुंबांना नळाच्या पाण्याचे कनेक्शन उपलब्ध होते, जे आता वाढून ५४% झाले आहे. ग्रामीण भागात पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, मंत्रालय ग्रामीण समुदायाला सहभागी करून घेत आहे आणि तंत्रज्ञानाची मदत घेत नाविन्यपूर्ण उपाय तयार करत आहे. प्रत्येक गावात पाणी आणि स्वच्छता कमिटी निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे. “आम्ही खेड्यातील महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि त्यांना सर्व १२ मूलभूत पॅरामीटर्सवर गुणवत्ता तपासण्यासाठी हातात पकडण्याजोगी उपकरणे दिली. ते त्यांच्या गावातील पाण्याची वारंवार चाचणी करू शकतात. वितरण होत असलेल्या पाण्याच्या गुणवत्तेचा ऑनलाइन रिअल टाईम अहवाल माझ्या कार्यालयात येतो. सर्व काही, मी जे काही बोलत आहे, संपूर्ण मिशनची सर्व माहिती सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध आहे,” श्री शेखावत यांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या नवकल्पनांसाठी आणि हस्तक्षेपांसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनम वांगचुक, संचालक, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह, लडाख (HIAL), यांच्या शब्दांची सर्व जण आतुरतेने वाट पहात होते. त्यांनी खऱ्या उद्योजकतेचा अर्थ सोपा करून सांगितला.

" माझ्यासाठी, जे फक्त पैसे आणि अधिक पैसे कमवतात ते उद्योजक नाहीत. उद्योजक हे समस्या सोडवणारे असले पाहिजेत. जर तुम्ही समस्या सोडवणारे नसाल, तर तुम्ही उद्योजक नाही. दुसरे म्हणजे, जर तुम्ही पैसे कमवत असाल आणि समस्या सोडवत असाल, तरी तुम्ही मी चांगले उद्योजक नाही. तुम्ही इतरांना तुमच्याबरोबर येण्यास मदत केली पाहिजे. मगच तुम्ही खरे उद्योजक आहात."

चंद्रशेखर घोष, सीईओ आणि एमडी, बंधन बँकेने, शून्यातून बँक उभी करताना प्राप्त केलेल्या त्यांच्या तळागाळातील आणि परंपरागत ज्ञानाने सहभाग्यांना मंत्रमुग्ध केले

"भारत एक मोठा देश असल्याने, जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर विस्तार केला नाही तर देशावर कोणताही परिणाम होणार नाही," असे म्हणत त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिले, “म्हणून जर मला विस्तार करायचा असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे मला प्रक्रिया, प्रणाली आणि उत्पादन सुलभ करणे आवश्यक आहे; जे माझ्या ग्राहकांना सहज समजते, ज्यापैकी बहुतेक जण साक्षर नाहीत.”

कुणाल बहल, सह-संस्थापक, एस व्हेक्टर ग्रुप (स्नॅपडील, युनीकॉमर्स आणि स्टेलॅरो) हे त्यांच्या विचारमंथनात, उद्योजकांना लोकांच्या आकांक्षा पाहण्यासाठी आणि देशाच्या दृष्टिकोनाशी जुळवून घेण्याचे आवाहन केले.

"पुढील 20 वर्षांमध्ये, जगभरात खरेदी होणारी बहुतांश सॉफ्टवेअर उत्पादने #मेडइनइंडिया असतील," असे त्यांनी भाकीत केले. “आणि तो आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाचा क्षण असेल! जगातील कोणताही देश आपल्याइतका डिजीटल नाही. यूपीआय किंवा ओएनडीसी, आधार, किंवा अकाउंट एग्रीगेटर इंडिया स्टॅक, इंडिया हेल्थ स्टॅक - हे भारताबाहेरील जगभरातील लोकांनी या गोष्टी ऐकलेल्याही नाहीत. आणि ही फक्त सुरुवात आहे. आम्हाला भविष्याबद्दल खूप आशा आणि उत्साह आहे. भारतात राहण्याची ही अगदी उत्तम वेळ आहे!”

ईशा लीडरशिप अकादमी योजना किंवा व्यावहारिक तंत्रांच्या पलीकडे जाऊन स्वाभाविक आणि अंतर दृष्टीतून नेतृत्व विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते. बाह्य परिस्थिती आणि लोकांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रथम स्वतःचे मन, शरीर आणि उर्जेचे व्यवस्थापित करणे हे यामागचे मुख्य तत्व आहे.

गेल्या दशकात, ईशा इनसाइट: द डीएनए फॉर सक्सेस हा जगातील सर्वाधिक मागणी असलेला व्यवसाय नेतृत्व कार्यक्रम बनला आहे. यापूर्वी, कार्यक्रमातील सहभाग्यांना रतन टाटा, एनआर नारायण मूर्ती, किरण मुझुमदार-शॉ, जीएम राव, केव्ही कामथ, अजय पिरामल, हर्ष मारीवाला, अरुंधती भट्टाचार्य यांसारख्या दिग्गजांनी मार्गदर्शन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com