Israel Airstrike : इस्रायलकडून गाझावर पुन्हा हल्ला, अनेकांचा दुर्दैवी मृत्यू आणि....
इस्रायल आणि गाझा यांच्यात युध्दविरामाचे चित्र दिसत असताना अचानक शुक्रवारी रात्रीपासून इस्रायलने गाझापट्टीवर पुन्हा हवाई हल्ले केले आहेत. त्यात निष्पाप नागरिकांसह 66 बालकांचा नाहक बळी गेला आहे. या पाश्वभूमीवर अमेरिकेने या युद्धात सहभाग घेतल्यामुळे हा तणाव जास्त वाढत गेला. आता इस्रायलने गाझावर पुन्हा हल्ला केल्याने दोन्ही देशांमध्ये संघर्षपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
इस्रायल सातत्याने गाझावर हल्ले करत आहे. हमासचा पूर्णपणे नाश करून ओलिसांना मुक्त करण्यासाठी तसेच गाझाने यापुढे इस्रायलसाठी कोणताही धोका निर्माण करू नये, यासाठी हे युद्ध चालू असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी सकाळपर्यंत गाझा शहरातील मुवासी येथील छावणीवर आणि पॅलेस्टाईन स्टेडियमजवळ हे हल्ले करण्यात येत होते. 23 जूनला या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली होती.
मात्र इस्रायलने ही युद्धबंदी तोडत पुन्हा गाझावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये सुमारे आतापर्यत 81 नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात 66 लहान बालकांचा समावेश आहे. अशी माहिती गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. इराणशी शस्त्रसंधी केल्यांनतर पुन्हा इस्रायलने गाझावर आपला निशाणा साधला. मात्र यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेला.
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दोन्ही देशांमधील युध्दविरामाच्या प्रयत्नांना मोठे अपयश आल्याचे दिसून येत आहे. गाझापट्टीवरील या हल्ल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. आता या युद्धाची पुन्हा सुरुवात झाल्यामुळे अमेरिकेचे ट्रम्प यावर काय भुमिका घेतात आणि या युद्धबंदीसाठी कोणते प्रयत्न करणार आहेत हे पाहणे महत्वाचे आहे.