SpaDex Mission: इस्रो इतिहास रचण्यास सज्ज, स्पॅडेक्स मिशनबाबत महत्त्वाची अपडेट
इस्रोचा महत्त्वकांक्षी प्रकल्प SpaDeX मिशनकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. ३० डिसेंबर रोजी PSLV-C60 रॉकेटमार्फत या मिशनचे प्रक्षेपण करण्यात आलं. त्यानंतर आता या मिशनमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच यशस्वी डॉकिंगकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. यासंदर्भात अंतराळामध्ये स्पॅडेक्सच्या यानांची चाचणी सुरु आहे. या टप्प्यातील महत्त्वाची चाचपणी आज करण्यात आली. त्यामुळे आता हे मिशन यशस्वी होण्यासाठी आता इस्रो फक्त एक पाऊल दूर असल्याचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
डॉकिंग म्हणजे काय?
३० डिसेंबर रोजी स्पॅडेक्स मिशनअंतर्गत सॅटेलाईट प्रक्षेपित करण्यात आले. या माध्यमातून इस्रो इन-स्पेस डॉकिंगचे प्रात्यक्षिक करणार आहे. डॉकिंग मोहीम यशस्वी झाल्यास इस्रोला त्याचा भविष्यात फायदा होणार आहे. चांद्रयान ४ च्या माध्यमातून चंद्रावरून नमुने आणणे, भारताचे अंतराळ स्थानक (Bharatiya Antariksha Station) उभारणे या मोहिमांमध्ये होणार आहे.
स्पॅडेक्स यशस्वी झाल्यास डॉकिंग या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने हे तंत्रज्ञान अवगत केलं आहे. अंतराळ मोहिमांमध्ये डॉकिंग-अनडॉकिंग तंत्रज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामुळे अंतराळयानाचे भाग अंतराळामध्ये ‘डॉकिंग’ म्हणजेच जोडणं शक्य होतं.
नियोजित भारतीय अंतरिक्ष स्थानकामध्ये पाच मॉड्युल्स असतील, जी अंतराळात एकत्र आणली जातील. त्यापैकी पहिले मॉड्युल २०२८ मध्ये प्रक्षेपित होणार आहे. इस्रो ही क्षमता त्याच्या पुढील चांद्र मोहिमेसाठीदेखील वापरेल. त्या मोहिमेदरम्यान इस्रो नमुने परत आणण्याची योजना आखत आहे. चांद्रयान-४ ला दोन स्वतंत्र प्रक्षेपणे आणि अंतराळात डॉकिंग करण्याची आवश्यकता भासेल.
डॉकिंगचे प्रात्याक्षिक
पृथ्वीच्या वर ४७० किमी अंतरावर दोन्ही सॅटेलाईट्सचा डॉकिंग आणि अनडॉकिंगचा प्रयोग करण्यात येणार आहे. चेझर आणि टार्गेट हे दोन स्पेडेक्स सॅटलाईट एकमेकांच्या ३ मीटरच्या जवळ आले असल्याचं इस्रोने ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच यासंबंधी डेटा अॅनालाईज करून करण्यात येत आहे. सध्या हे सॅटेलाईट्स एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आले असल्याचं इस्रोच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पाहा इस्रोने एक्स या सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केलेली पोस्ट-