आज इसरोचं 'बाहुबली' रॉकेट होणार लाँच

आज इसरोचं 'बाहुबली' रॉकेट होणार लाँच

इसरो आज महत्त्वाचं रॉकेट प्रक्षेपण करणार आहे. इसरोचं हे पहिलं व्यावसायिक राकेट लाँचिंग आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरो नव्या मिशनसाठी सज्ज आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

इसरो आज महत्त्वाचं रॉकेट प्रक्षेपण करणार आहे. इसरोचं हे पहिलं व्यावसायिक राकेट लाँचिंग आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरो नव्या मिशनसाठी सज्ज आहे. या मिशनचं नाव LVM3 M2/OneWeb India1 आहे. 22 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून हे 'बाहुबली' रॉकेट 'LVM-3' लाँच करण्यात येईल. मध्यरात्री 12 वाजून 07 मिनिटांनी हे रॉकेट हवेत झेपावेल. हे रॉकेट ब्रिटिश स्टार्टअप वनवेब कंपनीच्या 36 सॅटेलाईट लाँच करण्यात येणार आहे.

वनवेब ही प्रायव्हेट ब्रिटीश सॅटेलाईट कंपनी आहे. भारतीय कंपनी इंटरप्रायजेज वनवेब कंपनीमध्ये प्रमुख शेअर होल्डर आहे. वनवेब सॅटेलाईट लाँचसह इसरो ग्लोबल कमर्शिअल लाँच मार्केटमध्ये प्रवेश करेल. 'बाहुबली' रॉकेट 'LVM-3' याआधी GSLV मार्क रॉकेट म्हणूनही ओळखले जात होतं. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि वनवेब यांच्याद्वारे 'LVM-3' रॉकेटमधून 36 सॅटेलाईट लाँच करण्यात येतील.

या मिशनद्वारे ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेबचे 36 सॅटलाईट लाँच करण्यात येतील. उपग्रहांना कॅप्स्युमध्ये बसवलं गेलं आहे. ISRO हे मिशन आपल्या सर्वात वजनदार रॉकेट 'LVM-3' वरून म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 मधून लाँच करणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com