Jay pawar marriage ajit pawar dance : बहरीनमध्ये जय पवारांचा विवाह सोहळा,मुलाच्या लग्नात अजित पवारांचा डान्स...

Jay pawar marriage ajit pawar dance : बहरीनमध्ये जय पवारांचा विवाह सोहळा,मुलाच्या लग्नात अजित पवारांचा डान्स...

आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या धाकट्या मुलाचा लग्नसोहळा पार पडत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या धाकट्या मुलाचा लग्नसोहळा पार पडत आहे. बहरीनमध्ये जय पवार यांचं लग्न पार पडत असून काही महिन्यांपूर्वीच जय आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला होता, आता यांचा विवाह सोहळा 4, 5 आणि 7 डिसेंबर रोजी बहरीनमध्ये होत आहे. बहरीनमधील या शाही लग्नसोहळ्यासाठी पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच बहरीनला लग्नाला गेले नाहीत.

आमदार रोहित पवार आणि नुकतेच जय पवार यांच्या लग्नासाठी विवाह झालेले युगेंद्र पवार यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. लग्नसोहळ्याच्या वरातीचे फोटो आणि व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळेंनी या शेअर केले आहेत. लग्नसोहळ्यासाठी खासदार शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे गेल्या नाहीत. मात्र, सुप्रिया सुळेंनी जय की बारात.. असे म्हणत या लग्नाच्या वरातीचे खास फोटो शेअर केले आहेत समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार पांढऱ्या रंगाच्या शेरवानी ड्रेसमध्ये डोळ्यावर गॉगल अन् फेटा बांधून नाचताना दिसून येतात. अजित दादांचा डान्स सध्या व्हायरल होत आहे.

लेकाच्या लग्नाच सैराट चित्रटातील झिंगाट गाण्यावर नाचताना बापमाणूस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पाहून अनेकांना तो व्हिडिओ चांगलाच आवडलाय. जय यांच्या वरातीत अजित पवारांसह आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हेही दिसून येत आहेत. रोहित पवार यांनीही पांढऱ्या रंगाचा शेरवानी आणि डोळ्यावर गॉगल घातल्याचं दिसून येतं. दरम्यान, या लग्नसोहळ्यातील हळदीचेही फोटो समोर आले असून पवार आणि पाटील कुटुंबीयांसह नातलगांच्या चेहऱ्यावरील लग्नाचा आनंदोत्सव लपत नाही

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com