Pune Jain Boarding Case : Big Breaking जैन मुनी निलेशचंद्र यांनी उपोषण घेतलं मागे; कारण काय?
थोडक्यात
मंबई महापालिकेनं नुकताच चार ठिकाणी कबुतरांना सकाळी सात ते नऊ ठराविक वेळी दिली आहे.
या निर्णयामुळे जैन समाजात तणाव निर्माण झाला आहे.
जैनमुनी निलेशचंद्र यांनी उपोषण घेतलं मागे घेतले आहे.
(Big Breaking ) मंबई महापालिकेनं नुकताच चार ठिकाणी कबुतरांना सकाळी सात ते नऊ या दोन तासांच्या ठराविक वेळी, नियंत्रित पद्धतीनं दाणे टाकण्यास परवानगी दिली आहे. मात्र आधीपासून बंद करण्यात आलेले जुने कबुतरखाने बंदच राहतील, अशी माहितीही महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. या निर्णयामुळे जैन समाजात तणाव निर्माण झाला आहे. कबुतरांना दाणे देणे ही त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचा भाग आहे, असं ठाम मत मांडत जैन मुनी निलेश चंद्र आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. या प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे.
जैनमुनी निलेशचंद्र यांनी उपोषण घेतलं मागे घेतले आहे. यावेळी मंगल प्रभात लोढा, नार्वेकरांच्या भेटीनंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. '15 दिवसांत सरकार काहीतरी तोडगा काढेल' असे आश्वासन लोढा आणि राहुल नार्वेकरांनी दिलं आहे. मात्र 15 दिवसांनी जर दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही, तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा निर्धार निलेश चंद्रमुनींचा आहे.

