Jaipur Express Firing : RPFचा कॉन्टेबल ताब्यात

Jaipur Express Firing : RPFचा कॉन्टेबल ताब्यात

जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

जयपूर मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पालघर ते विरार दरम्यान हा गोळीबार झाला. गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंगने चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. सध्या ही मुंबई सेंट्रल इथे दाखल झाली आहे.

घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. ही ट्रेन गुजरातमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये येताच गोळीबार झाला. आरपीएफ कॉन्स्टेबलने सहकाऱ्यावर गोळी झाडली यासोबतच 4 प्रवाशांनाही गोळ्या लागल्या. आरपीएफचा जवान चेतन सिंगने जीआरपीच्या जवानांवर गोळीबार केला. या दोन जवानांमध्ये वाद झाला होता. आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे.चौघांनाही बोरिवली येथील भगवती रुग्णालयात नेण्यात आले आहे. चेतन सिंग याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

चेतन सिंह नावाचा आरपीएफचा जवान जो एस्कॉर्ट ड्युटी वरती होता त्याने एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टीका राम यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गोळाबार करणाऱ्या चेतन सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेतन सिंग याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याची माहितीही समोर आली आहे. मीरा रोड स्थानकात ट्रेन थांबवून मृतदेह उतरवण्यात आले आणि शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत.

Jaipur Express Firing : RPFचा कॉन्टेबल ताब्यात
Jaipur Express Firing : जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार, 4 जणांचा मृत्यू

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com