जळगावमध्ये स्कूल बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी; 30 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी

जळगावमध्ये स्कूल बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी; 30 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी

जळगाव स्कूल बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी; 30 पेक्षा जास्त विद्यार्थी व दोन शिक्षक जखमी
Published by :
Siddhi Naringrekar

मंगेश जोशी, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या पहूर शेंदुर्णी दरम्यान आज सकाळी स्कूल बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूल बस पलटी होऊन अपघात झाला असून या अपघातात सुमारे 30 पेक्षा जास्त विद्यार्थी व दोन शिक्षक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

शेंदुर्णी येथील सरस्वती विद्या मंदिराची स्कूल बस पहुर येथून 40 विद्यार्थी व काही शिक्षकांना घेऊन शेंदुर्णी कडे जात असताना घोडेश्वर बाबा परिसरात हा अपघात झाला आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूल बस ही थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली व हे झाड तुटून बस पलटी झाली सदर अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात जखमी झालेले विद्यार्थी व शिक्षकांना तातडीने खाजगी वाहनातून पहुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केली तर सुदैवाने जखमींमध्ये कोणीही गंभीर नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. या अपघाताची माहिती पालकांना मिळतात पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे पालकांनी थेट घटनास्थळ गाठले. दरम्यान घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले असून या अपघाताबाबत पोलीस तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com