ताज्या बातम्या
Jalna : वाळूने भरलेला टिप्पर पत्राच्या शेडवर रिकामा केल्याने पाच मजुरांचा दबून मृत्यू
वाळूने भरलेला टिप्पर पत्राच्या शेडवर रिकामा केल्याने पाच मजुरांचा दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वाळूने भरलेला टिप्पर पत्राच्या शेडवर रिकामा केल्याने पाच मजुरांचा दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या पासोडी - चांडोळ जवळील रोडवर पुलाजवळ ही घटना घडली.
पुलाचे काम सुरु असताना पुलाचे काम करणाऱ्या मजुरांनी पुलाशेजारीच पत्र्याची शेड बांधली होती. मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच वाळूच्या टिप्परने त्यांच्या पत्र्याच्या शेडशेजारी वाळू रिकामी केल्याने त्या वाळूमध्ये दबून 5 मजूरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.