जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस 250 मीटर खोल दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस 250 मीटर खोल दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये प्रवासी बसला मोठा अपघात झाला आहे. दोडा जिल्ह्यातील आसार भागात बस 250 मीटर खोल दरीत कोसळली आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये प्रवासी बसला मोठा अपघात झाला आहे. दोडा जिल्ह्यातील आसार भागात बस 250 मीटर खोल दरीत कोसळली आहे. या बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस 250 मीटर खोल दरीत कोसळली, 30 जणांचा मृत्यू
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा आजपासून महाराष्ट्र दौरा

किश्तवाडहून जम्मूला जाणारी बसला दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगल येथे अपघात झाला. ही बस 250 मीटर दरीत कोसळली असून यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान मोदींनी म्हंटलं की, जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे झालेला अपघात दुर्दैवी आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य, प्रियजन या अपघातात गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com