ताज्या बातम्या
Terrorist Video Call : 'बाळा, शरण जा...', दहशतवाद्याच्या आईने केली विनंती, पण...; Video call व्हायरल
आमिरची आई त्याला शरण येण्यास सांगत आहे पण आमिर म्हणतो की सैन्याला पुढे येऊ द्या मग मी बघतो.
जम्मू काश्मीरमधील त्राल येथील नादेर परिसरात सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मारल्या गेलेल्या 3 दहशतवाद्यांची ओळखदेखील आता पडली आहे. दरम्यान, चकमकीत मारला गेलेला आमिर नझीर वाणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो त्याच्या कुटुंबाशी व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. आमिरची आई त्याला शरण येण्यास सांगत आहे पण आमिर म्हणतो की सैन्याला पुढे येऊ द्या मग मी बघतो.
त्याच्या आईसोबतच्या व्हिडिओ कॉलच्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये असे दिसते की त्याची आई त्याला "बेटा, शरण जा" असे म्हणत आहे, परंतु तो त्याच्या आईचे ऐकत नाही आणि सैन्यावर गोळीबार करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावे अशी इच्छा होती परंतु त्यांनी आत्मसमर्पण करण्याऐवजी दलावर गोळीबार केला. शेवटी तो सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला.