Fumio Kishida: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर बॉम्ब हल्ला
Admin

Fumio Kishida: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर बॉम्ब हल्ला

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत स्फोट झाला.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत स्फोट झाला. PM Fumio भाषण देत असताना त्याचवेळी स्मोक बॉम्ब हल्ला झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे.

वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा आपले भाषण सुरू करणार असतानाच हा स्फोट झाला. स्मोक बॉम्ब फेकल्यानंतर आजूबाजूला धुराचे लोट पसरले होते. घटनास्थळी जमलेले लोक सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी धावताना दिसत असल्याचे या घटनेच्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला पकडले. पंतप्रधान किशिदा थोडक्यात बचावले. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ ते भाषण करणार होते. अशी माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com