Dhananjay Munde : मुंडे या पृथ्वीतलावार नसावा असं जरांगेंना वाटतं..मुंडेंची जरांगेंवर टीका
थोडक्यात
जरांगेंना माझ्याकडून धोका नाही..
मुंडे या पृथ्वीतलावार नसावा असं जरांगेंना वाटतं..
मुंडेंची जरांगेंवर टीका
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांने पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केले. त्यांनी थेट माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असे म्हटले होते. आता त्यावर उत्तर देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडे पृथ्वीतलावरच नसावा हेच जरांगेंना वाटतंय असे म्हटले आहे.
मी जातपात मिळत नाही. मी ज्या जातीतून आलो, त्यापेक्षा इतर जातीचे लोक माझे मित्र. मी पाच वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. या पाच वर्षात जेवढी आंदोलन झाली तेवढ्यांचे समर्थन केलं. मी सभागृहात आवाज उठवला. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी सातत्याने लावून धरली. विधीमंडळाच्या लायब्ररीत त्याचे पुरावे आहेत. नगरमध्ये एक बलात्कार झाला. मी स्वत तिकडे गेलो. आरोपीला पकडून देण्याचं काम केलं असे धनंजय मुंडे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, १८ पगड जातीला जात असताना हा व्यक्ती आवरता येत नाही म्हणून या व्यक्तीला सामाजिक राजकीय वर्तुळातून मागे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. धनंजय मुंडे हा व्यक्ती पृथ्वी तलावर नसावा हे मनोज जरांगे यांना वाटत आहे. १७ तारखेच्या सभेत मी जरांगेंना दोनच प्रश्न विचारले. त्याचे उत्तर अजून मिळाले नाही. पहिला प्रश्न विचारला होता की, मराठा समाजाला ओबीसीत जाऊन फायदा आहे की ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे. याबाबत साडेबारा कोटी जनतेसमोर त्यांनी यावं, आम्ही येतो. कशात फायदा आहे यावर सोक्षमोक्ष करू. त्याचं उत्तर अजून आलं नाही.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, दुसरी विनंती केली होती, तो ओबीसीचा एल्गार मेळावा होता. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचा मेळावा होता. शिवाजी महाराजांनी जो गावगाडा उभा केला. तो दोन वर्षापासून बिघडला आहे. एका जातीचा मित्र, दुसऱ्या जातीचा मित्र राहिला नाही. दोन सख्खे भाऊ, एका मायबापाचे लेकरं विचार बदलले, जरांगेंच्या विचाराचा असेल तर दोन भाऊ एकमेकांना मानत नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे वातावरण कुणी केलं. आपण सर्वांनी एकत्र येऊन गावा गावातील सामाजिक तडा आपल्याला भरावा लागेल, नीट घडी बसवावी लागेल असं मी म्हटलं होतं.
