Manoj Jarange : जरांगे-पाटील यांच्या परत एकदा मराठा आरक्षणाबद्दल सरकारला सुचना, म्हणाले...

Manoj Jarange : जरांगे-पाटील यांच्या परत एकदा मराठा आरक्षणाबद्दल सरकारला सुचना, म्हणाले...

मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांनी शेतकरी आणि गॅझेट संदर्भात सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जरांगे-पाटील यांनी परत एकदा मराठा आरक्षणाबद्दल सरकारला सुचना केल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • ओबीसीमधून देऊ नका त्यांना ओबीसीतून का हवं?

  • मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीका

  • तुम्ही कशाला बंजारा समाजातून आरक्षण घेतलं?

मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांनी शेतकरी आणि गॅझेट संदर्भात सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जरांगे-पाटील यांनी परत एकदा मराठा आरक्षणाबद्दल सरकारला सुचना केल्या आहेत. आज (3 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत सरकाराकडे मागण्या केल्या आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका केली आहे. धनंजय मुंडे म्हणाले म्हणाले होते की, मराठा समजाला आरक्षण दिलं, याचा आनंद आहे. पण ओबीसीमधून देऊ नका त्यांना ओबीसीतून का हवं? या विधानावर प्रश्न विचारला असता जरांगो पाटील म्हणाले, तुम्ही का घेतलं बंजारा समाजातून? नाही घ्यायच, कशाला घेतलं? कशाला लोकांच्या काड्या करतो. मला काय बोलतो हेकन्या, आम्ही ओबीसीच खातो, मग तू बंजारा समाजाच का खातो? तू दिसतो का त्यांच्यासारखा?” अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.

रक्ताने हात माखलेल्यांचे प्रश्नही विचारु नका

धनंजय मुंडे यांच्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्ही कशाला बंजारा समाजातून आरक्षण घेतलं? कशाला लोकांच्या काड्या करतात. बीड जिल्ह्यातले मराठ्यांचे लोक आता आणखी शहाणे होतील. तुम्ही मला काय बोलता. आम्हाला ओबीसीचा खायचं तर तू कशाला बंजारा समाजाचे खातो? तू माझ्या नादी लागू नको. शहाणपणा करायचा नाही. तू तिकडे नीट राहायचं. रक्ताने हात माखलेल्यांनी माझ्या जातीवर बोलायचे नाही, तुम्ही रक्ताने हात माखलेल्यांचे प्रश्नही विचारु नका असे त्यांनी म्हटले आहे. त्याचसोबत तु माझ्या नादाला लागू नको नाहीतर तुझ राडकारणातलं नामोनिशान संपेल. असाही इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

तुझ्यामुळे अजित पवारांचा पण कार्यक्रम लावीन

तू जर इथून पुढे माझ्या नादी लागला तर मी सांगतो मी दोघांचाही बाजार उठवेन. तुझ्यामुळे मी अजित पवारांचा सुद्धा कार्यक्रम लावेन. मी जातीला इतका कट्टर मानणारा आहे की तुम्ही काहीच नाहीत. मी ऐकून घेत आहे म्हणजे शहाणपणा करायचा नाही. तो आता ज्याच्या प्रचाराला येईल ती सीट आता आम्ही पाडतो. मग ते मराठ्यांचा असला तरी चालेल, असे आव्हान मनोज जरांगेंनी धनंजय मुंडें यांना दिले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com