जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल; आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाचा 12-0ने दणदणती विजय
Admin

जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल; आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाचा 12-0ने दणदणती विजय

जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते

प्रशांत जगताप,सातारा

जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे,आमदार मकरंद पाटील यांचा विजय झालाय. शेतकरी विकास पॅनेलच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाचा 12-0ने दणदणती विजय मिळवला आहे.

महाविकास आघाडीचे दीपक पवार आणि ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्या युतीचा दारुण पराभव झाला आहे. हा विजय आगामी राजकीय गणित मजबूत करणारी असल्यामुळे आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्याबरोबर केलेली हात मिळवणी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी फायद्याची ठरली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com