भाजपातील एकाने पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांच्याप्रमाणे हिंमत दाखवावी फुकटचे बुडबुडे फोडू नयेत; सामनातून टीका

भाजपातील एकाने पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांच्याप्रमाणे हिंमत दाखवावी फुकटचे बुडबुडे फोडू नयेत; सामनातून टीका

जावेद अख्तर नुकतेच पाकिस्तानात गेले होते आणि त्यादरम्यान त्यांनी २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला होता.

जावेद अख्तर नुकतेच पाकिस्तानात गेले होते आणि त्यादरम्यान त्यांनी २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.'फैज फेस्टिव्हल २०२३मध्ये जावेद अख्तर सहभागी झाले होते. त्यावेळी जावेद अख्तर म्हणाले की, आपण एकमेकांवर आरोप करायला नको. कारण त्यातून काहीच साध्य होणार नाही. आम्ही मुंबईचे लोकं आहोत. तुम्ही सर्वांना पाहिलं की आमच्या शहरावर कसा हल्ला झाला. हल्लेखोर ना नॉर्वेमधून आले होते ना इजिप्तमधून. आजही ते लोक तुमच्या देशात उजळ माथ्यानं फिरत आहेतत. जर अशी तक्रार एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर तुम्ही त्याचं वाईट वाटून घेऊ नका. असे जावेद अख्तर म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने भाजपावर हल्लाबोल केला आहे. सामनातून म्हटले आहे की, ‘‘नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन, गुलाम अली यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांचे भारतात आपुलकीने स्वागत केले. त्यांच्या कार्यक्रमांना गर्दीच गर्दी झाली, पण पाकिस्तानात लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम कधी आयोजित झाला नाही.’’ जावेद अख्तर यांनी ही जाणीव करून देताच उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला. टाळय़ा वाजवून अख्तर यांना दाद देणाऱया श्रोत्यांच्या हिमतीचेही कौतुक करावे लागेल. अख्तर यांनी देशभक्ती व हिमतीची एक ‘मिसाल’ देशासमोर ठेवली.

तसेच पाकिस्तान हा देशाचा शत्रू आहे तसा तो चीनही आहे, पण मोदी फक्त पाकिस्तानला दम भरतात व चीनचे नाव घेतसुद्धा नाही वस्तुस्थिती आहे. चिनी ‘ऍप्स’ बंदी घातली की, मोदी सरकारचे चीनविरुद्धचे ‘धाडस’ संपते. “भारतीय जनता पक्षाची राष्ट्रवाद आणि देशद्रोहाची व्याख्या वेगळी आहे. जे त्यांच्या पालख्या उचलत नाहीत व जे त्यांचे गुलाम बनायला तयार नाहीत ते सर्व त्यांच्या दृष्टीने देशद्रोही ठरतात. जे मोदीभक्त नाहीत ते देशाचे नाहीत, असे त्यांचे सरळ सरळ मत आहे. मोदी व त्यांच्या हुकूमशाहीवर हंटर चालवणारा एखादा मुसलमान असेल तर विचारूच नका, पण ज्येष्ठ कवी-गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात घुसून पाकड्यांवर हल्ला केला. असे सामनातून म्हटले आहे. भाजपवाल्यांतील एखाद्याने पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांच्याप्रमाणे हिंमत दाखवावी. फुकटचे बुडबुडे इकडे बसून फोडू नयेत. ५६ इंचांची छाती काय ते जावेद अख्तर यांनी दाखवले. त्यांचे अभिनंदन असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com