Jay Bhanushali Mahhi Vij divorceJay Bhanushali Mahhi Vij divorce
ताज्या बातम्या
Jay Bhanushali Mahhi Vij divorce : 'या' अभिनेत्याने मोडला संसार! छोट्या पडद्यावरील अभिनेता झाला बायकोसोबत विभक्त
टीव्ही इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कपल जय भानूशाली आणि माही वीज यांचा 14 वर्षांचा संसार आता संपला आहे.
टीव्ही इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कपल जय भानूशाली आणि माही वीज यांचा 14 वर्षांचा संसार आता संपला आहे. काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चांना आता सत्यता मिळाली आहे, कारण हे दोघं वेगळे झाले आहेत.
जय आणि माही यांनी अधिकृतपणे आपला संबंध संपवला असून, त्यांना तीन मुलं आहेत. काही महिन्यांपासून त्यांच्या दरम्यान मतभेद सुरू होते आणि त्यानंतर घटस्फोटाच्या अफवा येत होत्या. अखेर, दोघांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता आणि आज कागदांवर सही केली. दोघं जुलपासून वेगळे राहत होते.

