BJP MLA Jaykumar Gore
BJP MLA Jaykumar Gore

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात;थरकाप उडवणारा VIDEO समोर

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

सातारा : प्रशांत जगताप |भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला आहे. फलटणमध्ये त्यांची कार पुलावरून 30 फूट खाली कोसलळली त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे.

पुणे-पंढरपुर रोडवर फलटणजवळ मालथनच्या स्मशानभूमीजवळ जयकुमार गोरेंची फॉर्च्यूनरएसयूव्ही कार पुलावरून 30 फूट खाली कोसलळली. प्राथमिक माहितीनुसार ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले. तर त्यांच्यावर फलटणमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहे.

BJP MLA Jaykumar Gore
Sania Mirzapur : सानिया मिर्झा देशातील पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट ठरली

जयकुमार गोरे यांच्यासह या गाडीमध्ये 4 आणखी लोक होते ते देखील गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर जखमींना बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपचे आमदार पुण्याहून दहिवडी या त्यांच्या गावी जात होते. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. पहाटेची वेळ असल्याने झोपेमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि फॉर्च्युन ब्रिजची रेलिंग तोडून 30 फूट खाली पडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com