Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

Sharad Pawar : जयंत पाटलांची ईडी चौकशी सुरु असताना शरद पवारांची पत्रकार परिषद, म्हणाले की...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत ईडी चौकशी सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 नेत्यांची आतापर्यंत तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आहे.
Published by :
shweta walge

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईत ईडी चौकशी सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 नेत्यांची आतापर्यंत तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग कसा सुरू आहे, असं म्हणत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादीच्या 10 नेत्यांची आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे. अनिल देशमुखांना नाहक तुरुंगवास घडला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह यांच्याविरोधात कितीतरी तक्रारी दाखल आहेत. त्याची यंत्रणांनी नोंद घ्यावी असेही पवार यांनी म्हटले. राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असून हा गैरवापर कसा होतोय हे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले.

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यावरही पवार यांनी भाष्य केले. सीबीआयने चौकशी सुरू केल्यानंतर नवाब मलिक यांनी घेतलेली भूमिका सत्यावर आधारीत होती असे पवारांनी म्हटले. समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांची किंमत मलिकांना चुकवावी लागली असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar
नानविज गावात एसटी सुरू झाली तेव्हाचा फोटो पोस्ट करत सुप्रिया सुळे यांची भावनिक पोस्ट

दरम्यान महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणतीच चर्चा  झाली नाही. आगामी निवडणुका एकत्रपणे लढवायच्या यावर एकमत झाले आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य जागा वाटपांबाबत चर्चा करणार आहेत. त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास, उद्धव ठाकरे, मी (शरद पवार) आणि मल्लिकार्जुन खर्गे अथवा सोनिया गांधी हे निर्णय घेतील, असे सिल्वर ओकवरील बैठकीत ठरले असल्याचे पवारांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com