पृथ्वीतलावर माझ्या नावे घरच नाही; ED ला सामोरे जायला तयार - जयंत पाटील
Admin

पृथ्वीतलावर माझ्या नावे घरच नाही; ED ला सामोरे जायला तयार - जयंत पाटील

जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता. जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं होते. मात्र जयंत पाटील यांनी वेळ वाढवून घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीने पाटलांना समन्स पाठवला आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, सध्या जे चाललं आहे, त्याच्या विरोधी भूमिका आपण घेतोय.पृथ्वीतलावर माझं स्वतःचं घर नाही. सांगलीचं घर बापूंच्या नावावर होतं. ते आईच्या नावावर झालं. आता माझ्या नावावर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचं सरकार आहे, त्यांना जे करायचं ते करू देत.

लोकांसमोर मान खाली घालायला लागेल, अशा प्रकारचं कृत्य माझ्याकडून आजपर्यंत झालेलं नाही. न होणार पण नाही. मी प्रामाणिकपणे कामावर भर देणारा माणूस आहे. त्यामुळं ईडीची चौकशी होत असताना तिला सामोरे जायला तयार आहे. असे जयंत पाटील म्हणाले.

पृथ्वीतलावर माझ्या नावे घरच नाही; ED ला सामोरे जायला तयार - जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीचे दुसरे समन्स
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com