वज्रमूठ सभा लांबणीवर, जयंत पाटील यांनी सांगितले कारण म्हणाले...

वज्रमूठ सभा लांबणीवर, जयंत पाटील यांनी सांगितले कारण म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही.

त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या होणाऱ्या सभेसह पुढील सर्व वज्रमूठ सभा रद्द होणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, वज्रमूठ सभा पुढे जाण्याचे कारण उष्णता प्रचंड या महिन्यात वाढणार आहे. अवकाळी पावसाचे संकेत हवामान खात्याने दिलेले आहे. त्यामुळे एवढी मोठी सभेची तयारी करणं अवघड आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक इथे पुढच्या सभा आहेत. म्हणून आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतला की, तूर्तास सभा टाळू. पुन्हा हवामान दुरुस्त झाले तर करु. असे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com