पुण्यात 'पोलीस निरिक्षकावरच' कोयत्याने हल्ला; जयंत पाटलांची आक्रमक प्रतिक्रिया, म्हणाले 'गृहखात्याचा भोंगळ कारभार'
पुण्यात पुन्हा कोयता गँगने धुमाकळू घालत दहशत माजवली असून यातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरिक्षकावरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी गृहखात्यावर बोचरी टीका करत प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पुण्यातून बोलत होते.
ते म्हणाले की, हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. आज पर्यंत पोलिसांवर हात उघडण्याची छाती कोणाची होत नव्हती. आज API वरच कोयता गॅंग हल्ला करायला लागली त्यात ते जखमी झालेले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या धज्या उडाल्या आहेत.
पुढे म्हणाले की, पोलिसांचा वचक राहिलेला नाही. गृहखात्याचा भोंगळ कारभार आहे. गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागले आहे. याचा आज पुण्यात अनुभव आला, याचा निषेध करतो. महाराष्ट्र पोलीस दलाब मागे सरकारने ठाम उभा राहिला पाहिजेल. महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली पाहिजे. सरकारचं राज्याच्या प्रशासनाकडे आणि पोलीस खात्याकडे लक्ष नाही.पुण्यातील पोलीस व्यवस्था किती दुबळी झाली आहे हे दिसून येत आहेत,अशी टीका त्यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले की, आता दोन महिने राहिले आहेत दोन महिन्यांसाठी त्यांचा राजीनामा मागण्यात अर्थ नाही असं मला वाटत मुख्यमंत्र्यांपासून सगळेच सरकार महाराष्ट्रात फेल गेलेला आहे. महिलांचं संरक्षण ते करू शकत नाही आता पोलिसांचं संरक्षण करू शकत नाही अशी समस्या निर्माण झालीय. कोणाची कधी बदली होईल आणि सगळ्याच बदल्या आर्थिक व्यवहार करून होत असेलत तर किती नैतिकता राहिली अशी टीका देखील त्यांनी केली आहे.