Jayant Patil : "चारही बाजूने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम होतंय"
अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने ज्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. यामध्ये मंजूर अनुदानातून 50 कोटी रुपये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी हडप केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, 'अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. यातील मंजूर अनुदानातून जवळपास सुमारे ५० कोटी रुपये अधिकाऱ्यांनी लंपास केल्याची माहिती खुद्द उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे.'
यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांच्या या पैशावर डल्ला मारला आहे. याबाबतची सत्यता शासनाने पडताळावी. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. चारही बाजूने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम होत आहे. सरकार आत्मचिंतन करणार का? कारण इथे कुंपणच शेत खात आहे.' असे जयंत पाटील म्हणाले.