Jayant Patil : ‘फुले’ चित्रपटावरुन जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाला सुनावले, म्हणाले...

Jayant Patil : ‘फुले’ चित्रपटावरुन जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाला सुनावले, म्हणाले...

‘फुले’ या चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

‘फुले’ या चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आक्षेप घेण्यात आला. त्यातच सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत. या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप घेतला आहे.

यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. त्यामुळे आता फुले या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, "काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या propoganda based फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र "फुले" सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे."

यासोबतच ते पुढे म्हणाले की, "Who is Namdeo Dhasal? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात याची कल्पना आली होती. पण आता "फुले" चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते." असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com