JEE (Advanced) 2025 Results Announced:  रजित गुप्ता आणि देवदत्त माझी अनुक्रमे मुलं-मुलींत अव्वल

JEE (Advanced) 2025 Results Announced: रजित गुप्ता आणि देवदत्त माझी अनुक्रमे मुलं-मुलींत अव्वल

JEE (Advanced) 2025 Results Announced: रजित गुप्ता प्रथम, देवदत्त माझी महिला श्रेणीत अव्वल.
Published by :
Team Lokshahi
Published on

देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स 2025 JEE (Advanced) 2025 परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा ही परीक्षा आयआयटीIIT कानपूरच्या वतीने 18 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत रजित गुप्ता (आयआयटी दिल्ली झोन IIT Delhi zone) याने 360 पैकी 332 गुण मिळवत कॉमन रँक लिस्टमध्ये In the common rank list (CRL) प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच झोनमधील सक्षम जिंदाल Saksham Jindal यानेही 332 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

मुलींपैकी सर्वाधिक गुण मिळवणारी उमेदवार म्हणजे देवदत्त माझी Devdatta Mazi (आयआयटी खरगपूर झोन IIT Kharagpur Zone). तिने 312 गुण मिळवत महिला श्रेणीत पहिल्या क्रमांकावर नाव नोंदवले असून सीआरएल CRLमध्ये ती 16 व्या स्थानावर आहे. आयआयटी मुंबई झोन (IIT Mumbai Zone) मधून परीक्षा दिलेल्या माजिद हुसेनने 330 गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे. या झोनमधील पार्थ वर्तक (327 गुण – 4था क्रमांक) आणि साहिल देव (321 गुण – 7वा क्रमांक) यांनी देखील टॉप 10 मध्ये स्थान मिळवत मुंबईचे प्रतिनिधित्व भक्कमपणे केले आहे.

या वर्षीच्या जेईई ॲडव्हान्स JEE (Advanced) परीक्षेसाठी देशभरातून 1, 87,223 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 1,80,422 विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये 1,39,085 मुले आणि 41,337 मुली होत्या. यंदा एकूण 54,378 विद्यार्थी पात्र ठरले असून त्यात 9,404 मुलींचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com