Jeff Bezos And Lauren Sanchez's Wedding : 61 वर्षांचा वर आणि 55 वर्षांची वधू; दुसऱ्या लग्नाची एक गोष्ट

Jeff Bezos And Lauren Sanchez's Wedding : 61 वर्षांचा वर आणि 55 वर्षांची वधू; दुसऱ्या लग्नाची एक गोष्ट

अमेझॉनचे संस्थापक आणि जगातील अब्जाधीशांपैकी एक जेफ बेझोस. वयाच्या61वर्षीय जेफ बेझोस दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहेत.
Published by :
Rashmi Mane
Published on

अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील अब्जाधीशांपैकी एक जेफ बेझोस. वयाच्या61वर्षीय जेफ बेझोस दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहेत. जेफ बेसोझ 27 जून रोजी त्यांची दीर्घकाळची मैत्रीण आणि पत्रकार लॉरेन सांचेझशी लग्न करणार आहेत. 55 वर्षीय लॉरेन सांचेझसोबत जेफ बेसोझचे हे दुसरे लग्न असेल.

चार मुलांचे वडील जेफ आणि लॉरेन सांचेझ यांचे लग्न व्हेनिसमध्ये होणार आहे. त्यांनी त्यांचे दुसरे लग्न संस्मरणीय बनवण्यासाठी शांत आणि कमी गर्दीचे शहर निवडले. तथापि, त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाबाबत त्यांना विरोध झाला आहे. व्हेनिसमधील लोक म्हणतात की, लग्नाच्या पार्ट्या गोंडोला आणि पलाझींच्या सुंदर आणि शांत शहराला श्रीमंतांसाठी खासगी मनोरंजनाचा भाग बनवत आहेत. जेफ आणि लॉरेनच्या लग्नाला जगभरातून 200-250 खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

जेफ आणि लॉरेनच्या लग्नात खास पाहुणे येत आहेत. इवांका ट्रम्पपासून ते मार्क झुकरबर्ग, बिल गेट्सपर्यंत, प्रसिद्ध लोक या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. लिओनार्डो डिकॅप्रियो, केटी पेरी, किम कार्दशियन, डायन सारखे हॉलिवूड स्टार व्हेनिसमध्ये येत आहेत. लग्नाच्या ठिकाणी तीन मोठ्या नौका आणि असंख्य आलिशान गाड्यांमधून हाय प्रोफाइल पाहुणे येत आहेत.

जेफ आणि लॉरेन यांचे लग्न व्हेनिसच्या आर्सेनलमध्ये होणार आहे. हे 14 व्या शतकातील एक भव्य संकुल आहे जिथे एकेकाळी जहाजे आणि शस्त्रे होती. पाहुणे चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या ठिकाणी वॉटर बोटींद्वारे पोहोचतील. 90 खासगी जेट, 30 वॉटर टॅक्सी आणि शेकडो कार बुक करण्यात आल्या आहेत, ज्या पाहुण्यांना लग्नस्थळी घेऊन जातील.

हेही वाचा

Jeff Bezos And Lauren Sanchez's Wedding : 61 वर्षांचा वर आणि 55 वर्षांची वधू; दुसऱ्या लग्नाची एक गोष्ट
Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं अंतराळातून केला लाईव्ह व्हिडिओ; म्हणाला...
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com